उपवासाची चंपाकली
===================================
हा प्रयोग मायबोली ह्या संकेतस्थळावरील स्पर्धेसाठी केला आहे.
===================================
मायबोलीवर पाककृती स्पर्धेची घोषणा झालीआणि त्यात भाग घेण्यासाठी डोक्यातविचारचक्र सुरु झाले. सर्वात आधी विचारआला की माझ्या मावशीला विचारावे. माझीमावशी अत्यंत प्रयोगशील त्यामुळे दिलेलेजिन्नस वापरून ती नक्कीच नवीन काहीतरीपदार्थ सुचवेल ह्याची खात्री होती. पण पुन्हामनात स्वतःचं असं स्वतंत्र विचारचक्र सुरुझालं.
मध्यंतरी फेसबुकवरच्या एका ग्रुपमध्येमैत्रिणीच्या आईने चंपाकलीचे फोटो टाकलेहोते. तेव्हापासूनच ती पाककृती करूनपाहायची इच्छा होती. पण मुहूर्त काही लागलानाही. जेव्हा ह्या स्पर्धेची घोषणा झाली तेव्हाराजगिऱ्याचं पीठ वापरून चंपाकलीचा प्रयोगकरता येईल का असं वाटलं. पण घरातीलगणपती आणि अशीच एक अडचण असल्यानेशेवटी कालचा मुहूर्त लागला.
राजगिऱ्याच्या पिठाला थोडा चिकटपणाअसतो हे मला माहित होते. पण त्याची पातळपोळी लाटून, त्याला काप देऊन चंपाकलीसाठीगुंडाळणे ह्यासाठी अजून चिकटपणा हवा असेवाटून त्यात शिजलेला बटाटा घालायचे ठरवले.आणि सांगू काय हा प्रयोग यशस्वी झाला.
तर आता सविस्तर साहित्य आणि कृती देते.
साहित्य:
१. उकडलेला बटाटा - १
२. राजगिरा पीठ - त्या उकडलेल्याबटाट्यामध्ये मावेल एवढे (मला अंदाजे ३/४वाटी लागले)
३. साखर - १/२ वाटी
४. तेल
कृती:
१. उकडलेला बटाटा बारीक कुस्करून घेतला.
२. त्यात राजगिऱ्याचे पीठ मिसळून चांगलेमळून घेतले. (ह्यात पाणी अजिबात घातलेनाही.)
३. मळलेला गोळा साधारण तासभर झाकून ठेवला.
४. चंपाकलीसाठी पुऱ्या लाटायला सुरुकरायच्या आधी एका पसरट भांड्यात साखरआणि पाणी एकत्र करून पाक करायलाठेवला. साधारण १ तारी पाक तयार ठेवला.
५. साधारण जरा मोठ्या सुपारीएवढा गोळाघेतला आणि त्याची शक्य तेवढी पातळ पुरीलाटली. पुरी लाटताना राजगिऱ्याच्या पीठ लावावं लागलं.
६. त्या पुरीला समांतर असे काप दिले. पुरीच्याकडेपासून साधारण १/२ - १ सेंटिमीटर अंतर ठेवून मध्ये हे काप दिले.(ह्या वेळीचा फोटोकाढायचा विसरले.)
७. मैद्याच्या चंपाकलीसाठी जशी ही पुरीगुंडाळतो तशी गुंडाळी केली.
८. छान तापलेल्या तेलात मंद आचेवर खरपूसतळून घेतली.
९. तळलेली चंपाकली तेल निथळायला बाजूला ठेवली आणि नंतर पाकात १/२ मिनिट बुडवून ताटलीत काढली.
अश्या रीतीने एकादशी दुप्पट खाशी साठीची चंपाकली तयार आहे.
टीप:
ह्या साहित्यामध्ये साधारण १२ चंपाकलीचे पीसेस झाले.
एवढं सगळं उत्साहाने केल्यावर आला महत्वाचा भाग. घरच्यांनी चव पाहून पावतीदेणे. नवऱ्याला जेवताना वाढल्यावर त्यानेमुकाट्याने खाल्ली. मग मी आवर्जून विचारल्यावर मला म्हणे फारंच छान झालीआहे. विकतचा खाद्यपदार्थ आहे असे खातानावाटून मी काहीच बोललो नाही. (आमच्याकडेएखादा पदार्थ बाहेरच्यासारखा होणे म्हणजेअत्युच्च दर्जाची पावती मानली जाते. कारणनवऱ्याच्या लहानपणी सासूबाईंनी कौतुकानेशेव करून त्यांच्या मुलाला खायला घातली तरम्हणे स्वस्तिकसारखी झाली नाही! :D)
तर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे चव कशीहोती? तर चव आणि कुरकुरीतपणा साधारण जिलेबीसारखा होता.
तर ६४ कलांची देवता असलेल्या गणपतीनेपाककलेत एक नवीन प्रयोग करून सिद्धीलानेण्याची बुद्धी दिल्याबद्दल आणि मायबोलीनेहा प्रयोग सर्वांसमोर मांडण्याची संधीदिल्याबद्दल त्यांचे अनेकानेक आभार!
Comments
Post a Comment