चटकोशिंबीर

तुम्हांला प्रश्न पडेल की काय हे नाव आणि काय हा पदार्थ? मध्ये एकदा आमच्या सोसायटीमधील एका काकूंकडे खाल्ला या हा पदार्थ. बटाटेवड्यांबरोबर तोंडीलावणे म्हणून होता. त्याला चटणी म्हणावं तर दह्याचं प्रमाण बरंच जास्त आणि कोशिंबीर म्हणावे तर तिच्यात सर्वसाधारणपणे घातले जाणारे घटकपदार्थ यात नाहीत. म्हणून मग मीच ह्याचं नामकरण केलं चटकोशिंबीर (चटणी + कोशिंबीर).

साहित्य:
कोथिंबीर, पुदीना (कोथिंबीरीपेक्षा पुदिना कमी म्हणजे अगदी स्वादासाठी घेतला आहे) , मिरच्या (आमच्या घरी हिरव्या मिरच्या चालत नाहीत म्हणून मी लाल सुक्या मिरच्या घातल्या) आणि दही

कृती:
१. दही एका गाळणीत घालून पाणी निथळत ठेवावे.
२. कोथिंबीर, पुदिना आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यातच चवीनुसार मीठ घालावे.
३. एका कुंड्यात दही आणि ही चटणी छान एकजीव कालवावी.
४. पानात डाव्या बाजूला वाढण्यासाठी चटकोशिंबीर तयार झाली. 


Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा