लसणाच्या पातीची चटणी


ह्या रविवारी आठवडी बाजारात भाजीखरेदीला गेलो होतो तेव्हा लसणाची पात दिसली. तेव्हा अर्थातच विकत घ्यायचा मोह टाळता नाही आला. घरी आणली खरी, पण पुढे काही करायला आजचा मुहूर्त लागला. काय केलं तर पातीची चटणी. त्याचीच कृती इथे देत आहे.

साहित्य:
लसणाची पात 
जिरे - १/२चमचा
लाल तिखट - १ चमचा
मीठ - चवीनुसार


कृती:
१. पात स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी.
२. पातीचे जाडसर काप करून घ्यावेत म्हणजे बारीक करायला सोपे जाईल.
३. जाडीभरडी चिरलेली पात आणि इतर साहित्य दगडी खलबत्त्यामध्ये घेऊन बारीक करावे.

अत्यंत झणझणीत अशी चटणी तयार आहे. लसणाची स्वतःची चव आणि तिखट ह्याने जी चव येते ती झटका देणारी असते.


दगडी खलबत्त्यामध्ये चटणी बारीक केल्याने त्यात पाणी अजिबात घातले नाहीयेत्यामुळे ही चटणी बरेच दिवस टिकते.
मिक्सरमध्ये करता येईल कातर अर्थातच हो. पण एकूण साहित्य कमी असल्याने बारीक करताना कदाचित पाण्याचा वापर करावा लागेल.

माहितीचा स्रोत:
सासूबाई  

Comments

Popular posts from this blog

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

माझे बाबा

कथा - भिंतीवरील चेहरा