I love you
 काल आदित्यने त्याच्या वर्गातल्या आर्याला 'I love you ' म्हणलं. मग  ती त्याला म्हणाली की माझं तुझ्याशी प्रेम आहे. आणि ते हे एकमेकांशी उभं  राहून बोलत असताना अदितीने ऐकलं  आणि सगळ्यांना सांगितलं. आणि मग  सगळे खूप हसले.      तुम्हाला काय वाटतं. हा किस्सा काय वयाच्या मुलांचा असेल?    .   .   .   मला वाटतंय की माझ्या काळातला असला असता तर साधारण किमान वय १२-१३ तरी असले असते. अलीकडे ते हळू हळू खाली येत आहे. पण हा किस्सा माझ्या धाकट्या कन्येच्या वर्गात घडला. वय किती तर फक्त वर्षे ५!!!     आज सकाळी मी काम करत असताना तिने मला सांगितलं  की तिच्या वर्गात काल एक गंमत  झाली आणि तिने वर दिलेली घटना सांगितली. माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.  त्याला कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेचना.      भविष्यात काय काय प्रकारचे प्रसंग येणार आहेत याची ही मला नांदी वाटली. प्रश्न उरतो की असे प्रसंग हाताळायचे कसे. आहे काही उत्तर तुमच्याकडे?