Posts

Showing posts from 2010

MP3

परवा   सहजच   माझ्या   ऑफीस   मधल्या   सहकार्याला   माझा   ब्लॉग   दाखवत होते .  खरं तर तो तेलुगु   त्यामुळे   माझा मराठीतला   ब्लॉग त्याला काही कळणार   नव्हता .  पण   तरीही ... मग तो मला विचारत होता की कशाबद्दल लिहितेस ? Audio coding? मी म्हणाला की टेक्निकल   काहीही   नाही   फक्त   अवांतर .  मग मी विचार करू लागले की एखाद दुसरी   टेक्निकल विषयावरची पोस्ट लिहायला काही हरकत नाही . आणि ज्या तांत्रिक विषयाबद्दल मी लिहू शकते तो फार वेगळा , समजायला अवघड असा काही नाही . कारण आपण ती टेक्नोलॉजी दैनंदिन जीवनात वापरतो . त्यामुळे आजची पोस्ट mp3 के नाम ! गाण्याच्या mp3 फाईल्स आपण आजकाल किती सर्रास वापरतो नाही . डिजिटल audio players न आपण सहजच mp3 players  म्हणून टाकतो . मला आठवतंय मी कॉलेज   मध्ये असताना म्हणजे साधारण ९८ - ९९   साली माझी एक मैत्रीण एका सीडी मध्ये शेकडो गाणी घेऊन आली होती...

कौन बनेगा करोडपती - अंतिम भाग

आज कौन बनेगा करोडपतीचा शेवटचा भाग झाला. आजकाल कुठलाही कार्यक्रम फक्त ९ आठवड्यांच्या कालावधीत संपणे हे एक आश्चर्यच आहे.   ई TV मराठीवर या गोजिरवाण्या घरात हि सिरीयल जवळ जवळ आठ वर्षे चालू आहे. माझ्या मोठ्या मुलीच्या जन्म आधीपासून. तिच्या कळत्या वयापासून तिला वर्षानुवर्षे चालणारे कार्यक्रम पहायची सवय झाली आहे. त्यामुळे तिला हा कार्यक्रम इतक्या लवकर संपतो हि फारंच तिच्या शब्दात सांगायचं तर एक अनोखी गोष्ट आहे. (बोलीभाषेत हिंदी शब्दांचा वापर हे हिंदी कार्टून बघण्याचे परिणाम आहेत.)   त्यामुळे ह्या कार्यक्रमाबद्दल असलेली टीका कि हा एक reality show आहे, काही उत्तरांसाठी एवढे पैसे असली तरी अमिताभ बच्चनची मी die-hard fan असल्याने  हा कार्यक्रम संपला ह्याची मनाला जरा हुरहुर लागली आहे. .    सूत्रसंचालन करताना हा माणूस कोणी इतरांनी लिहिलेले डायलॉग न म्हणता तो उत्स्फूर्तपणे ब...

तिळाचे तेल

पुण्यात थंडीचा एवढा जोर आहे की तिच्या पासून बचाव आणि त्यासाठीचे उपाय ह्या शिवाय दुसरं काही सुचत नाहीये. म्हणूनच मग मागची पोस्ट बदामाच्या तेलाबद्दल होती. पण बदामाचे तेल तसे बरेच महाग असते. त्यामुळे त्याचा वापर शक्यतो तोंडापुरताच ठेवला जाऊ शकतो. पण थंडीच्या दिवसात अंग पण बरंच फुटतं. मग त्याच्यावर तिळाचे तेल हा एक घरगुती उपाय आहे.   खरंतर त्याकरता पण बाजारात बरेच lotions वगैरे मिळतात. पण माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की अतिउत्साहात मी असल्या सगळ्या गोष्टी विकत आणते आणि वापरायची वेळ आली की कंटाळा करते. मग त्या प्रोडक्टची expiry date उलटून जाते आणि मला ते फेकून द्यावे लागतात. म्हणून मग मला हे घरगुती उपाय स्वस्त आणि परिणामकारक वाटतात.     तर मी सांगत होते तिळाच्या तेलाबद्दल. तिळाचे तेल हे ऊष्ण गुणधर्...

बदामाचे तेल

Image
खरंतर कागदोपत्री थंडी सुरू होवून एक महिना उलटून गेला. पण निसर्गाने प्रचंड विक्षिप्तपणा करत मधेच पाउस, मधेच प्रचंड उकाडा असे वेगळेच रंग दाखवले. त्यामुळे झाले असे कि जी पोस्ट मी खूप आधी लिहिणार होते ती राहूनंच गेली. पण आता पुण्यात थंडीने भलताच जोर धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर हि पोस्ट लिहायला घेतली आहे. माझी स्वतःची त्वचा फार कोरडी आहे. त्यात आता थंडी म्हणाल्यावर तर बघायलाच नको. उपाय बरेच असतात. बाजारात मिळणारी विविध क्रीम्स, moisturisers इत्यादी इत्यादी. पण माझ्या अनुभवातला घरगुती आणि प्रभावी उपाय म्हणजे बदामाचे तेल. तसे सर्वांना माहितंच आहे कि बदामात ई विटामिन असते म्हणून. आणि ई विटामिन त्वचेसाठी पोषक असते.   मला स्वतःला दुधात बदाम उगाळून चेहर्याला लावतात हे माहित होते. पण एवढे परिश्रम घ्यायचा कंटाळा. मग ह्याला काही सोप्पा पर्याय मिळतो...

Latest drawing...

Image
आधी सांगितलं तसं drawing क्लास चालू केला आहे. मधे माझ्या ताईच्या घरी काही अडचणी असल्याने बरेच दिवस क्लास बंद होता. आणि मग जेव्हा पुन्हा सुरु झाला तेव्हा उठून क्लासला जाणे नको वाटत होते. पण विचार केला की आत्ता जर आळस केला तर माझा क्लास कायमचा बंद होईल. म्हणून मग नेटाने पुन्हा चालू केला आहे. आज जे चित्र इथे पोस्ट करत आहे त्याच्यावर बरेच दिवस काम चालू होते. आधी रेखाचित्र काढणे आणि मग रंगवणे. माझ्या ताईच्या म्हणण्या नुसार जसजशी मी चित्रे काढत जाईन तसतशी चित्रात रंग भरताना जास्त वेळ लागेल. कारण जास्त details लक्षात येउन तसे रंगवण्याचा प्रयत्न असेल. असो. तर ह्या चित्राला पण बराच वेळ लागला.          

२६/११

कालंच २६ नोव्हेंबरला जो दहशतवादी हल्ला झाला त्याला २ वर्षे पूर्ण झाली. टीवी वरच्या विविध वाहिन्या, वर्तमानपत्रे आणि रेडियोवरसुद्धा त्याचीच चर्चा होती. काल घरी येताना रेडियो मिर्चीवर एक जाहिरात/आवाहन पण ऐकलं की तुम्ही सतर्क रहा आणि २६/११ सारख्या घटना टाला.  मग सहजंच मनात विचार आला की मुंबईमधे लोकल मधेसुद्धा bomb स्फोट घडवून आणले ती घटना कधी झाली. मला तरी तारीख आठवत नाही. मग वाटलं की आपण एवढे निरढावलेले आहोत का की अश्या घटना आपण सहज-सहजी विसरत आहोत. पण मग लक्षात आलं की २६/११ ची घटना आपण विसरत नाही आहोत. असं का?         ह्या प्रश्नावर विचार करता करता लक्षात आलं की प्रसारमाध्यमे आपल्याला हे अजिबात विसरु देत नाहीयेत.      लोकलमधे जे स्फोट घडवून आणले त्यात तर २०० च्या वर माणसे मृत्युमुखी पडली आणि शेकडो माणसे...

माझ्या आवडीची गाणी

आपण कुठल्याही वयोगटाची चर्चा बघितली तर लक्षात येईल की एक-मेकांच्या छंदा बद्दल बोललं जातं. आणि त्या छन्दांमधे गाणी ऐकणे हा एक छंद असतोच असतो. आणि कुठल्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात ह्या वरून त्या माणसाची अभिरुची आणि तो माणूस कसा आहे ते ठरवलं जातं. तर मलाही गाणी ऐकायला आवडतात. मला कश्या प्रकारची गाणी आवडतात... जरा अवघड प्रश्न वाटतो मला. कारण माझी आवड बरेचदा त्या त्या वेळची परिस्थिति, सभोवतालची माणसं ह्या वर अवलंबून असतं. शाळेत असताना एक काळ होता जेव्हा एका पाकिस्तानी गायकाचं 'हवा हवा' हे गाणं आवडायचं. उडती चाल म्हणून मग त्याच्यावर नाच करायला खूप आवडायचं. मग मधला असा एक काळ होता की मैत्रीणीन्ना आवडायच्या म्हणून मलाही गझला आवडायच्या. मग हॉस्टल मधे असताना मैत्रिणी इंग्लिश गाणी ऐकत असल्याने मला पण आवडू लागली. असो. असं सर्व...

माझी कलाकुसर

Image
जेव्हा जागतिक मंदीची लाट आली होती तेव्हा त्याचा थोड्या फार प्रमाणात मला पण फटका बसला.  अगदी नोकरी जरी गमावली नाही तरी प्रोजेक्ट नव्हता. मग काय करायचे हा एक यक्षप्रश्न होता. मग विविध ब्लॉग वाचायला सुरुवात केली. त्यात एक ब्लॉग सापडला. kalanirmitee.blogspot.com. जिचा ब्लॉग आहे ती एक खूपच चांगली कलाकार आहे.  बऱ्याच वेग-वेगळ्या कलांचे आविष्कार तिथे बघायला मिळतात. त्यातच paper quilling नावाचा प्रकार बघायला मिळाला. बघायला मिळाला म्हणण्यापेक्षा जो एक प्रकार मी आधी बघितला होता त्याला paper quilling म्हणतात हे कळले.  मग   त्याच्या पासून प्रेरणा घेउन मी पण घरी सामान आणलं आणि काही प्रयोग चालू केले. त्यातलाच एक प्रयोग इथे खाली देत आहे...          

गैरहजेरी

इतक्या दिवसांची माझ्या ब्लॉग वरची गैरहजेरी...  मनात खूप काही चालू होतं. माझ्या ब्लॉगच्या  नावाप्रमाणे बरेच तरंग उठत होते पण ते इथपर्यन्त पोहोचलेच नाहित.  जसं समुद्रातली प्रत्येक लाट काठापर्यन्त पोहोचत नाही तसंच काहीसं झालं.  रोज सकाळी सकाळी ६:३० च्या आधीचा वेळ माझा स्वतःचा असतो. मग स्वयंपाक करता करता बरेच विचार येत असतात डोक्यात. मग असं वाटतं की हे आपण ब्लॉगवर नक्की लिहायला पाहिजे. पण दिवस संपता संपता जेव्हा ब्लॉग वर लिहायची वेळ येते तेव्हा ती ऊर्मी संपलेली असते किंवा तेवढी पुरेशी नसते.  एक तर पोस्ट लिहायला पण घेतली पण ती अजून अर्धवट अवस्थेमधे आहे.   आज पण आत्ता जेव्हा ही पोस्ट लिहायला घेतली तेव्हा नक्की काय लिहावे हा प्रश्न होता. पण विचार केला की निदान लिहायला तर सुरुवात करावी मग बघू काय होतं ते. आणि झालंही तसंच. काही तरी लिहावं हा विचार करून सुरुवात केली. ही पोस्ट म्हणजे इतक्या दिवसात काही न लिहीण्याचे जे चक्र सुरु झाले होते त...

Comfort zone

आत्ता नुकतीच एक पोस्ट इंग्लिश मधे टाकली. कारण ज्या मी केलेल्या दिवाळीच्या पदार्थांचे appraisal करायचे होते. आणि तो प्रकार मला असे वाटले की मी इंग्लिश मधेच जास्त सहजतेने मांडू शकले असते.  मराठी ही जरी मातृभाषा असली तरी दैनंदिन जीवनात इंग्लिशचा वापर जास्त असल्याने ती जास्त comfortable वाटली. आणि ह्या comfort zone मधे गेल्यावर बरंच बरं वाटलं. आजंच एके ठिकाणी वाचलं की comfort zone हे कूपमंडूक वृत्तीला दिलेले एक गोंडस नाव आहे. पण बर्याच दिवसांनी comfort zone मधे जाउन येणे बरं वाटलं.   पण हा फक्त एक बदल होता. पुन्हा आपली मायबोली मराठी आहेचे लेखन करायला.

Appraisal

Though I could not write anything about my Diwali preparations, I’ve decided to do an appraisal of my Diwali-Faral and write about it… :D (Recently we had a presentation given by our center head, regarding the overall appraisal procedure in the company. So still I have that hang-over… :P) Before starting this write-up, I checked the exact meaning of appraisal on the net. It means ‘the act of estimating or judging the nature or value of something or someone’. So in this post I’m going to evaluate my tryst with Diwali-Faral. As I mentioned before I still have that hang-over of the meeting about Appraisal, I’ll start with formal procedure of the appraisal. So the very first is to set the goals based on which we can evaluate the performance. So what were the goals that I set for myself? I decided to make variety of items for diwali which can be listed below: Chivda Laadu (Besan) Laadu (Rawa-Naral) Karanji Shankarpali Anarase Chakali Shev Chirote Time allotted to achiev...

Speed thrills but...

प्रसंग १:   साधारण ७-८ महिन्यांपूर्वी स्थळ: बाणेर रोड  वेळ: साधारणतः ६:३० - ६:४५ James  Bond ला जसे license to kill मिळालेले असते तसे बाणेर रोड वर गाडी चालवणारे सर्व जणांना license to drive fast मिळाल्यासारखे  वागत असतात. तर अर्थातच मला पण हे असे license मिळाले आहे अश्या थाटात मी पण गाडी चालवत असते. टू-व्हीलर वर एकदा एक छोटा एक्सिडेंट झाला आहे तरी वेगाचं वेड काही कमी होत नाही.  त्या दिवशी तर नवर्याची गाडी असल्याने तर सूसाट चालले होते. (असं वाटतं की जर १४०० cc ची गाडी चालवायची तर सावकाश चालवून तिला न्याय कसा मिळणार! ) University  chya सिग्नलला पोहोचायच्या थोडं आधी मी एका गाडीला असच कट मारला आणि पुढे गेले. आणि त्या वेळेस डोक्यात विचार आला की आपण एवढे वेगात गाडी चालवत आहोत आणि काही अपघात झाला तर... माझा स्वतःचा काही बरं वाईट झाला तर निदान  माझ्या स्व...

काही तरी...

बरेच दिवस झाले काहीच नविन पोस्ट केला नाही. कित्ती गोष्टी ठरवल्या होत्या लिहायच्या म्हणून. पण सगळे राहूनच गेले. दिवाळीच्या  शुभेच्छा द्यायच्या होत्या, मी केलेल्या पदार्थांबद्दल लिहायचे होते पण राहूनच गेले. उत्साहाने ओतप्रोत भरलेली दिवाळी आली आणि भरपूर आनंद देऊन गेली. एखादा कार्यक्रम आपण जर ठरवला असेल तर कसं आपण पूर्ण झोकुन देऊन काम करतो. आणि तो कार्यक्रम संपला की कसे रितेपण येते तसे आत्ता झाले आहे. एकदम रिकामं-रिकामं वाटत आहे. आता काय करू असे झाले आहे. मग लक्षात आले की अरे, आपला ब्लॉग आहे ना... कित्येक दिवसात आपण काहीच लिहिला नाही. म्हणून मग आज म्हणला की काही तरी लिहावं. पण अर्थात काय लिहावं हे निश्चित नसल्याने काय शीर्षक द्यावे हाही एक मोठा प्रश्न होता. म्हणून काही तरी लिहायचा विचार करून लिहायला घेतल्याने 'काही तरी' असे शीर्षक देऊन टाकले. म्हणजे मग नावातंच एक disclaimer टाकल्याने नक्की काय लिहायचे ह्याचे बंधन नाही. आणि काय लिहिल ते फार अर्थ पूर्ण असायला पाहिजे असंही नाही. (कसली हुशार आहे ना मी....

while(1)

Programming मधे (मला फक्त C programming येतं त्यामधे तरी निदान ) वेग-वेगळी loops असतात. त्यातलंच एक while loop. तर जेव्हा वरील दिल्या प्रमाणे (while (1)) loop असते तेव्हा त्याला infinite loop म्हणतात. एकदा ते loop चालू झाले की  आपण काही conditon देऊन ब्रेक केल्या शिवाय ते ब्रेक होत नाही. तसच आपल्या मनाचं पण होतं बर्र्याचदा... एकदा एका विचारत अडकले की त्यातून काही केल्या बाहेर येत नाही. आपल्याला काळात असतं की ह्यातून बाहेर पडायला पाहिजे पण ती ब्रेक contition काही केल्या execute होतंच नाही. आपलं मनाचं प्रोग्राम्मिंग काही तरी चुकतं बहुतेक! त्या लूपच्या बाहेर कित्येक चांगल्या गोष्टी असतात. पण मन मात्र नको त्या गोष्टींचा विचार करत आपली सगळी शक्ती त्यात खर्ची करत बसतं... आपल्या कामात जेव्हा एखादी functionality implement करायची असते तेव्हा आपण किती गोष्टी करतो. वेग-वेगळी डिजाईन docs. प्रत्येक error contition साठी check  आणि आप...

आजची हजेरी...

Image
रोज ब्लॉग वर काही ना काही पोस्ट करायची एवढी सवय झालीये की काहीच पोस्ट नाही करायचा म्हणजे काही तरी चुकल्या सारखा वाटतं. (एखादी गोष्ट नव्याने करायला लागला की कसं त्याचाच नाद लागतो तसा झाला आहे. ) आज आता लिहिलं तर काही नाही मग पोस्ट काय करायचं.... तर असच नव्याने काढलेले एखादं चित्र टाकावा असं म्हणते. आवडलं तर अवश्य सांगा...

सरळ रेष

आधी सांगितले तसे हौसेने drawing क्लास चालू केला आहे. तर असच एका क्लास मधे दाराच्या चौकटीला टेकून उभ्या असलेल्या बाईचे चित्र काढायचे होते. आधी बाई काढली आणि मग चौकट काढायची होती. ही सगळी चित्रकला freehand. तर अशी ही चौकट बिन पट्टीची  काढली. माझी शिक्षिका जिला मी ताई म्हणते ती मला म्हणाली ‘अरे वा! बिन पट्टीची छान सरळ रेष काढली आहेस’. तर माझे उत्तर होते की सरळ रेष draw करणे सोप्पे झाले आहे. त्या पेक्षा वेगले आकार किंवा गोलाई काढने फार अवघड जाते. असो. तर मुद्दा हा आहे की चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता सरळ रेषेची इतकी सवय झाली आहे की त्याच्या पलिकडे जाऊन वेगले आकार, वेगले विचार करणे अवघड जात आहे. काही लेखन करायला जावे तरी एकदम...

तिरंगी प्रेमळ माकड

  माझी धाकटी कन्या – वय वर्षे 3. तिच्या कल्पना शक्ती बद्दल काय बोलावे! अजुन शाळेत जात नाही. परन्तु तिची ताई आणि आजू-बाजूची मुले शाळेत जात असल्याने ती पण तिच्या कल्पनेतल्या शाळेत जाते. तिच्या शाळेत तिच्या एक धांडे teacher आहेत. तिला जे काही येत असेल ते सगळे त्यांनी तिला शिकवलेले असते. मग तिच्या शाळेत अनेक प्राणी आहेत. उदाहरनार्था जिराफ, हत्ती, भू-भू, मनी-माऊ आणि माकड. त्यातली मनी माऊ तर तिच्या कडे बघून हसते आणि तिच्या गालावरून हात फिरवून तिला माया-माया पण करते. तिचे कल्पना-विश्व इतके रंगी-बिरंगी आहे की काय सांगू… J आणि ती अत्यंत रसभरीत वर्णन करते की त्याचे चित्र सुद्धा नजरे समोर येते. तर अश्या तिच्या कल्पनाविश्वताल्या एका माकडाचे...
माझी ऑफिस मधे एक मैत्रिण आहे तिचा एक ब्लॉग आहे. तसा म्हणला तर बरच अलीकडे तिने ब्लॉग्गिंग सुरु केला आहे. आणि ती मला कायम सांगत असते की मी एक feedjit नावाचे gadget traffic बघण्यासाठी वापरत आहे आणि अमुक प्रकारचे लोक विसित करत आहे असा ती मला कायम उत्साहात सांगत असते. तेव्हा तिचा कौतुक अवश्य करत असते. पण जेव्हा माज्या ब्लॉग वर माझ्या व्यतिरिक्त इतर visitor जेव्हा मी पाहिला/पाहिली तेव्हा मला कोण आनंद झाला! ह्या ब्लॉग मुले पुन्हा एकदा लहान झाल्याचा आनंद मिळत आहे.  लहानपणी कसा काहीही नविन गोष्ट केली की इतरांनी ती किमान पहावी आणि कौतुकही करावा. आताही अगदी असच वाटत आहे. आता फरक फक्त एवढा आहे की निदान इतरांनी हा ब्लॉग पहावा तरी ही अपेक्षा... :) हा आनंद साजरा करण्यासाठी ही पोस्ट. बघूयात अजून काय कारणास्तव नविन नविन पोस्ट लिहायच्या ते...   

माझी चित्रकला!!!

Image
रोज नव-नविन ब्लोग्स वाचणारी मी आज जेव्हा ब्लॉग लिहायला चालू करते तेव्हा अनेक प्रश्न पडत आहेत. माझ्या पोस्ट चे title मराठी मधे कसे द्यावे. तर जर कोणाला ह्या प्रश्नाचे उत्तर देता आले तर मला अवश्य कलवावे... तर नमनाला घडाभर तेल ओतले कारण मला मराठी मधे पोस्ट चे शीर्षक मला देता आले नाही... :( तर ही पोस्ट लिहायचे कारण म्हणजे माझ्यातील हौशी चित्रकाराचे (?) चित्र इथे पोस्ट कराचे आहे. शाळेत असताना कधी माहीत नव्हते की थोडे जास्त परिश्रम घेतले तर अंगातील कला जेवाध्य असतील तेवढ्या विकसित होतील. पण म्हणतात न "It is better late than never ". आत्ता एक चित्रकलेचा क्लास लावला आहे. त्यापैकीच एक चित्र इथे पोस्ट करत आहे.

श्री गणेशा!

गावाकडच्या जत्रेत वेग-वेगळ्या प्रकारची माणसा यायची असे म्हणतात - हौशे, नवशे आणि गवशे... तसंच ह्या ब्लॉग च्या जत्रेतली मी हौशी... :) ब्लॉग च्या नाव प्रमाणे मनात बरेच तरंग असतात. त्यांना मूर्त स्वरुप इथे देता येइल असे वाटते.