Posts

Showing posts from 2011

ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स

Image
गेले काही दिवस ऑफिसमध्ये बरेच काम आहे. घरी सुद्धा श्रावण महिना आणि नंतर गौरी गणपतीमुळे स्वैपाकघरात जरा जास्त वेळ घालवला जातोय. त्यामुळे ब्लॉगवर सलग दुसरी पोस्ट  एका खाद्यपदार्थाची आहे. असो. खूप पूर्वी मी कुठे तरी ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स ही रेसिपी वाचली होती. पण आत्ता ती करून बघायचा योग आला. माझ्या दोन्ही मुलींना हा प्रकार खूप आवडला. ज्वारीचे पीठ वापरले असल्याने पोटभरीचे होते. (मध्ये एकदा आमच्या संध्याकाळच्या स्वैपाकाच्या मावशी आल्या नाहीत तर ह्या नूडल्स आम्ही जेवणात खाल्ल्या.)  नूडल्स साठी लागणारे पदार्थ खालील प्रमाणे: ज्वारीचे पीठ - १ वाटी लसूण - २ -३ पाकळ्या  जिरे - १ चमचा  ओवा - १/२ चमचा  कोथिंबीर  हळद (रंग येण्यापुरती) कांदा - १ बारीक उभे काप करून  तेल - १ चमचा  मीठ कृती: १. लसूण, जिरे, ओवा आणि कोथिंबीर सर्व एकत्र मिक्सरवर बारीक करून घ्यावेत. २. ज्वारीचे पीठ परातीत घेऊन त्यात हळद, मीठ आणि वरील वाटलेले साहित्य मिसळावे. ३. वरील सर्व साहित्यात पाणी मिसळून भाकरीकरता मळतो तसा गोळा मळून घ्यावा.   ४. चकली/शेव करायचा सोऱ्या घ्यावा. नूडल्स ...

साखरभात

Image
काल अनंत चतुर्दशी  झाली . आमच्या घराच्या गणपतीचं विसर्जन झालं. त्यामुळे सकाळी नैवेद्याला गोड काय करावं हा विचार चालू होता कारण गणेश चतुर्थीला मोदक करून झाले होते. मग विचार केला की साखरभात करावा. (मागे एकदा केला तेव्हा फसला होता. त्यामुळे ह्या वेळेस करा टेन्शन होतं.) तरी पण ह्या वेळेस केलेला प्रयोग बराच यशस्वी झाला म्हणून म्हणाला की मी केली पाक-क्रिया सर्वांना सांगावी.  तर त्यासाठी लागणारे किंवा मी वापरलेले जिन्नस आहेत:    तांदूळ - १ १/२ वाटी    साखर - तांदळाच्या दीड पट    लवंगा - ३-४     बदामाचे काप    बेदाणे     वेलदोड्याची पूड     केशर     लिंबू - १/२     तूप  कृती: १. सर्वात प्रथम तांदूळ (मी कोलम वापरले) निवडून स्वच्छ धुवून किमान अर्धा तास निथळत ठेवावेत. २. जाड बुडाच्या कढईत २ चमचे साजूक तूप घालावे आणि त्यात लवंगा घालून त्यात तांदूळ परतावेत.  ३. तांदूळ थोडे परतले गेले की त्यात गरम पाणी  घालावे. पाण्याचे प्रमाण कुठला तांदू...

बदल

आज मी माझ्या ब्लॉगचे  टेम्प्लेट बदलले. आणि मला इतका आनंद झाला आहे की जणू काही आपल्या बाळाला छान अंगडे-टोपडे घातल्यावर बाळाच्या आईला बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे होते तसे झाले आहे.  आज आता फक्त बाह्यरूप बदललं आहे. आता बघुयात अजून नव-नवीन पोस्टच्या रूपात अजून किती त्याची जडण-घडण करता येते ते बघायचं!

शुभ प्रभात!

आज माझ्या igoogle च्या पानावर एक सुविचार वाचला. कनफ्युशियासचा तो विचार आहे.  " Life is really simple, but we insist on making it complicated. " खरच किती बरोबर आहे ना! आपल्याला माहित झालेल्या अनेकानेक अवघड सिद्धांतांचा वापर करून एक सोप्पा गणित आपण अवघड करायला जातो. असो. तर ह्या सुंदर विचाराने आपल्या दिवसाची सुरुवात करूयात. शुभ प्रभात!!!

पोलीसमामा

आज ऑफिस मधून निघाल्यावर खूप दमल्यासारखा वाटत होतं. आणि तरीही काही काम पूर्ण झालंय असं वाटत नव्हतं. Performance measurement साठीचं self -assessment manager ने आज पर्यंत भरून ठेवायला सांगितलं होतं ते पण झालं नव्हतं.  अगदी कंटाळून गेल्यासारखं झालं होतं.     मग घरी यायला निघाले तर युनिवर्सिटी सर्कल पाशी पोहोचल्या पोचल्या सिग्नल लागला. त्यामुळे गाडी सर्वात पुढे होती. जवळ जवळ २ मिनिटांचा सिग्नल असल्याने मग गाडी बंद करून निवांत इकडचं तिकडचं निरीक्षण चालू होतं. आणि आमचा सिग्नल सुटायला जेमतेम ४० सेकंद उरले असतील आणि औंध रस्त्याने शिवाजी नगर कडे जाणारा एक टेम्पो अचानक उजवीकडे पाषाण रोडला जाण्यासाठी वळला. आणि युनिवर्सिटीच्या गेटच्या बाहेर ट्राफिक पोलीस होते. त्यांनी त्या टेम्पोला थांबवण्यासाठी हात केला. परंतु तो टेम्पो न थांबता पुढे जाऊ लागला. मग त्यांच्यात एक इन्स्पेक्टर होता तो पळत त्या टेम्पोच्या मागे जाऊ लागला. तसे युनिवर्सिटी गेट ते पाषाण रोडची बाजू बरेच अंतर आहे. आणि ती इन्स्पेक्टर तसा बराच सुदृढ होता. पण त्याने पळत पळत जाऊन त्या टेम्पोला गाठले आणि त्याला ...

२१ दिवस - एक सवय

मागच्या वर्षी आमच्या कंपनी मध्ये एक ट्रेनिंग झाला होतं. Behavioural training! त्यात आमच्या ट्रेनरने बर्याच गोष्टी सांगितल्या. त्यातली एक गोष्ट होती - एखादी सवय अंगी बाणवण्यासाठी ती गोष्ट रोज अशी सलग २१ दिवस जाणीवपूर्वक करायची. असे करण्याने ती सवय तुमच्यात रुजते. म्हणजे तुमच्या मेंदूच्या एका भागाशी थेट कनेक्शन होते म्हणे. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट आपोआप नियमितपणे करू लागता म्हणजेच ती सवय तुमच्या अंगी बाणली जाते. जसे एखादे ट्रेनिंग संपले की त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी आपण आचरणात आणायचं ठरवतो तसंच हे ट्रेनिंग संपल्यावर सुद्धा ही गोष्ट करायची ठरवली होती. कधी ऑफिसला वेळेवर पोहोचण्याचा नेम धरायचा ठरवला तर कधी नियमित व्यायाम करायचं ठरवलं. पण ३-४ दिवसातच उत्साह मावळायचा आणि पहिले पाढे पंचावन्न!   मग असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहेत आणि त्या असल्या ट्रेनरने फक्त शिकवायच्या. आणि आपण तेवढ्या पुरतं ऐकून सोडून द्यायच्या. पण मनात कायम असे विचार येत राहायचे की आपण साधी एक सवय अंगिकारू शकत नाही! आणि मग काय एक दिवस असंच आलं मनात आणि ठरवून टाकलं की नियमित ...

स्नेहसंमेलन - २

काल झालेले माझ्या धाकटीचे स्नेह-संमेलन हा एक अत्यंत आनंददायी, मनाला सुखावणारा अनुभव होता. आधीच्या पोस्टमध्ये लिहिलं त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि त्याचं त्या सुंदर कार्यक्रमाच्या स्वरूपामधलं ते फळ बघून खरच खूप आनंद झाला. पण सर्वात जास्त आनंददायी गोष्ट म्हणजे माझ्या कन्येने केलेला डान्स, तिची देहबोली, तिचं मुलीसारखं दिसलेलं गोंडस रूप. (माझी धाकटी कन्या अगदी Tom-boy आहे. म्हणजे ती कपडे फक्त शर्ट आणि pant घालते. केसांना क्लिप, रबर लावणे तर दूरच पण चुकूनही भांग सुद्धा पाडत नाही.) तिला प्रथम तिच्या शिक्षकांनी 'माकारीना' ह्या गाण्यावरच्या डान्स मध्ये घेतलं होतं. पण आधी सांगितलं त्याम्प्रमाणे तिची देहबोली, तिचं आत्मविश्वास बघून त्यांनी तिला 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' ह्या गाण्यात सुद्धा तिला घेतले. त्या गाण्यात सर्व प्राणी आणि पक्षी सुखाने एका जंगलात नांदत असतात आणि अश्या ह्या जंगलात एक मुलगी बागडत असते. तर ती मुलगी माझ्या धाकट्या कन्येने साकारलेली. आणि सर्वात शेवटी सर्व लहान मुलांचा हात धरून पर्यावरण वाचवा हे सांगणारा बोर्ड हातात घेणे हे ...

स्नेह-संमेलन

कालच्या पोस्ट मध्ये लिहिल्याप्रमाणे आज आमच्या शेंडेफळाच्या शाळेचे स्नेहसंमेलन होते. आमच्या सर्वांची वरात (५ मोठी आणि ३ लहान अशी ८ माणसे एका गाडीत!) ९ वाजता टिळक स्मारकला पोहोचली. तर टिळक स्मारकचा परिसर लहान-लहान मुले आणि त्यांचे पालक, आज्जी-आजोबांनी फुलून गेला होता. (माझी धाकटी जिथे जाते ती शाळा एक playgroupची शाळा आहे. वय वर्षे १.५ ते जास्तीत जास्त ३.५ पर्यंत.)  माझी कन्या एका डान्स मध्ये होती. त्यासाठीचा केवळ तिचा फ्रॉक शिवून न झाल्याने तिला फक्त चेहर्याला मेकप करून तिच्या शिक्षकांच्या ताब्यात द्यायचं होतं. ९ पर्यंत तिथे पोहोचायचे असल्याने तिचे प्रातर्विधी, आंघोळ आणि नाष्टा एवढे आटोपून कसेबसे तिथे पोहोचल्याने मेकपचा कार्यक्रम तिथे चालू झाला. मग एकदम गुलाबी गुलाबी गाल, गडद गुलाबी ओठ असा मेकप करून तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केलं.       मग साधारण पावणे दहाच्या सुमारास कार्यक्रम चालू झाला. आधी त्यांनी कार्यक्रमाची रूप-रेषा समजावून सांगितली त्याप्रमाणे एकूण ८ डान्स होते. आणि सर्वात शेवटी बक्षीस समारंभ. कार्यक्रमाची घोषणा झाल्यावर मूळ ...

रंगीत तालीम

उद्या माझ्या धाकट्या कन्येच्या शाळेचे स्नेह-संमेलन टिळक स्मारक येथे आहे. त्याची रंगीत तालीम आज तिथेच होती. सकाळी ९:३० ला तिथे सोडायचे आणि १२:३० वाजता परत घेऊन यायचे. टिळक स्मारक म्हणजे घरापासून बर्या पैकी लांब. मग कोणाल सांगणार म्हणून खास सुट्टी काढून त्या मोहिमेवर गेले. ९:३० वाजता तिथे पोहोचलो आणि तिला तिच्या शिक्षकांच्या स्वाधीन केल्यावर प्रश्न उरला की तीन तास काय करायचे! पहिले अर्धा-एक तास तिथेच जवळ असलेल्या ग्राहक पेठेत वेळ घालवला. आणि थोडी फार खरेदी केली. (थोडी खरोखर गरजेची आणि फार उगाचच अवांतर). पुन्हा प्रश्न उरला की आता काय करायचे. शेजारीच S.P. कॉलेज आहे. माझं कॉलेज. खरं तर अकरावी आणि बारावी अशी दोनच वर्षे तिथे काढलेली. पण शाळेतल्या शिस्तबद्ध आणि बंधनयुक्त काळानंतरचा पहिला काही काळ तिथे घालवलेला. त्यामुळे बर्याच आठवणी जोडलेल्या. तसं ते कॉलेज सोडून आता जवळा जवळ १५-१६ वर्षे झाली. आणि एकदा बारावीचा रिझल्ट घेतल्यावर कधी तिकडे मी गेलेच नाही.         मग आज विचार केला की जाऊन तर बघुयात. खरं तर अकरावी-बारावीला कोणी फार कॉलेजला जाऊन बसतं असं नाही. पण ...

भेंडीची भाजी

परवा डब्यासाठी भाजी करायची म्हणून भेंडी घेतली. भेंडीची भाजी चोरटी होते म्हणून अर्धा किलो घेतली. परंतु सकाळी सकाळी जेव्हा चिरायला घेतली तेव्हा त्यातली निम्मी किडकी निघाली. त्यामुळे झाला असं की डब्यासाठी पुरेशी भाजी झाली नाही आणि किडकी निघाल्याने बघत बघत भेंडी चिरावी लागल्याने  त्यात वेळ बराच गेला. त्यामुळे जीव वैतागून गेला. मग जेव्हा जेवायला गेले तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना सांगत होते की मी कशी डब्याला पुरावी म्हणून एवढी  भाजी आणली आणि किडकी निघाल्याने मला पुरेशी भाजी आणता आली नाही आणि सकाळी चिरताना वेळ पण गेला. एकूणच मी तक्रारींचा सूर आळवत होते. माझी एक मैत्रीण म्हणाली की भेंडी किडकी निघाली याचा अर्थ ती चांगली आहे. आम्हाला प्रश्न पडला किडकी भेंडी चांगली कशी असू शकते. तर तिचा त्या मागचा विचार असा की भेंडी किडली ह्याचा अर्थ शेतकऱ्यांनी जास्त कीटकनाशकं त्यावर फवारली नाहीयेत. म्हणजेच मला कमीत कीटकनाशकं मारलेली भाजी मिळाली. आहे की नाही सकारात्मक दृष्टीकोनातून विच...

अमानुष

काल टीवी वर बातमी बघितली - मनमाड जवळ नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांना भेसळखोरांनी जिवंत जाळले. मन सुन्न झाले. काय म्हणावे अश्या अमानुष कृत्त्याला! एक सरकारी अधिकारी कर्तव्यदक्षता दाखवून पेट्रोलमध्ये होत असलेली भेसळ रोखण्याचा प्रयत्न करतो आणि ते गुंड त्यांना जिवंत जाळून ठार मारतात. कदाचित असे कृत्य करत असताना गुन्हेगारांना ठाऊक असते की त्यांना अभय मिळणार आहे. त्यामुळे ते अशी कृत्य करताना कचरत नाहीत. इतर वेळेस आपण ओरड करतो की सरकारी अधिकारी कर्तव्यदक्षता दाखवत नाहीत म्हणून. परंतु ज्यांनी धाडसाने कर्तव्य बजावायचा प्रयत्न केला त्यांन त्याचे हे फळ मिळावे. राज्यातल्या कायदा आणि सुवूवास्थेची शोकांतिका म्हणायला हवी. अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्यांना जिवंत जाळले त्यांच्या मागे बायको आणि २ मुली आहेत. सरकारने तत्परतेने २५ लाखांची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देऊ केली आहे. पण त्या बाईचा नवरा आणि मुलींचे वडील तर परत येऊ शकत नाहीत. आणि जे अधिकारी कर्तव्यांची जाणीव ठेवून काम करू इच्छितात त्यांच्या मनात कायम हे भय असणार की कदाचित आपणही ह्या गुंडाराजचे बळी ठरू शकतो. मग त्...

इमानदारी!

इमानदारी हा शब्द जरी घेतला तरी सर्व साधारणपणे आपल्या डोळ्या समोर कुत्रा हा प्राणी येतो. बहुतेक त्याच्या इतकं इमानदार इतर कोणी नसावं! अश्याच एका कुत्र्याचा हा किस्सा आहे. अनेक वर्षं झाली तरी विसर पडत नाहीये.    माझी एक अगदी जीवलग मैत्रीण. त्यांचा बंगला असल्याने त्यांनी कुत्रा पाळला होता. त्याचा रंग पूर्ण काळा होता आणि अत्यंत ferocious होता तो. त्यांच्या घरातली आणि बाहेरची १-२ माणसे वगळता तो बाकीच्यांच्या अंगावर अगदी धावून जायचा. म्हणजे घराची राखण करण्यासाठी एकदम परफेक्ट. मला तर फार भीती वाटायची त्याची. पण माझ्या मैत्रिणीचे वडील अचानक म्हणजे साठीच्या आतंच हृदयविकाराने वारले. सगळ्यांसाठी तो खूप मोठा धक्का होता. त्या कुत्र्याने अन्न सोडून दिले. आणि अवघ्या २-३ आठवड्यात तो पण वारला. काय ही निष्ठा... आज केवळ ही गोष्ट इथे लिहित असताना पण माझे डोळे भरून आले.       

पेपर क्विलिंग - भेटकार्ड

Image
मला कलाकुसर करायला बर्यापैकी आवडते. त्यातल्या त्यात कागद वापरून विविध वस्तू करायला जास्त आवडतं. त्यातलाच एक प्रकार म्हणजे पेपर क्विलिंग! मला फार आवडणारा प्रकार. फार सुंदर दिसते. करणारे बरेच advanced प्रकार करतात. (internet आपण ते बघू शकतो) माझी कला साधी भेटकार्डे करण्यापुरती मर्यादित आहे.   त्यापैकीच एक भेटकार्ड खाली पोस्ट करत आहे. 

फोर्ट जाधवगडची सैर

Image
पुण्याजवळ सासवड रस्त्यावर विठ्ठल कामतांच फोर्ट जाधवगड म्हणून एक हॉटेल आहे. पूर्वी जाधवांची ती गढी होती. तिचं मूळ स्वरूप जास्तीत जास्त ठेवून त्यांनी एका हॉटेल मध्ये रूपांतर केलं आहे. मध्ये त्यांच्या हॉटेलच्या मार्केटींगचा भाग म्हणून काही discount देऊन एक वर्षाचं सदस्यत्व देत होते. त्यात बर्याच गोष्टी complimentary पण होत्या/आहेत. असंच काही तरी वेगळा अनुभव म्हणून ते सदस्यत्व घेतलं. त्यातीलच एक भाग म्हणजे तिथे एक दिवस एक रात्र मुक्काम मोफत होता.       अनायसे मला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टी असते. मुलींना तर काय नाताळची सुट्टी असतेच. आणि सगळ्यांनी एकत्र निवांत वेळ घालवावा अश्या विचाराने नवर्याने पण रजा काढलेली असल्याने एक दिवस तिकडे घालवायचा ठरलं.      खरं तर पुण्यापासूनचं अंतर आहे साधारण ३५ किलोमीटर. पण अर्ध्याहून अधिक रस्ता हा शहर आणि वर्दळीच्या भागातला असल्याने जायला यायला त्यामानाने बराच वेळ लागला. पण तिथे पोहोचल्यावर मात्र तुतारी वाजवून जंगी स्वागत झाले. आणि विनाकारण जास्त वेळच्या झालेल्या प्रवासाचा शीण गेला. पूर्वीची गढी आताचं ह...

Are they twins!!!

मला दोन मुली आहेत. मोठी - वय वर्षे ७ आणि धाकटी - वय वर्षे ३.    मागच्या आठवड्यात आम्ही एका लग्नाला गेलो होतो. तर एका बाईने माझ्या नवर्याला विचारले की "Are they twins ?"   आता बहिणीच असल्याने दोघींची चेहरेपट्टी बरीच सारखी आहे. म्हणजे धाकटीच्या जन्मानंतर कित्येक जण म्हणत होते की दोघी मोठ्या झाल्यावर जुळ्यासारख्या दिसतील म्हणून! आम्हालाही वाटतं की मोठ्या झाल्यावर त्या बर्याच सारख्या दिसतील. माझी धाकटी कन्या पण वयाच्या मानाने जरा उंच आहे पण तरीही आत्ता (म्हणजे एवढ्या लहान वयात ४ वर्षांचं अंतर खूप जास्त असताना)  असं विचारणं म्हणजे मला कमालच वाटली

Van!!!

माझी मोठी कन्या सध्या दुसरीत आहे. शाळा तशी जवळच आहे. पण van ने येते जाते. सकाळी सकाळी ७:३० वाजता तिची van येते. तसं जरा लवकरच असल्याने तिच्याच्याने उठणं होत नाही आणि त्यामुळे आवरणं.   तरी नशीबाने आमच्या घरातून बिल्डींगचा गेट आणि रस्ता दिसत असल्याने van जरी आली तरी van च्या काकांना थांबवता येतं. आणि van च्या होर्नचा आवाज अगदी स्वयंपाकघरापर्यंत येतो.    तर असंच एक दिवस कन्या तयार होउन निघायच्या बेतात असताना मला हॉर्नचा आवाज आला. पण जरा van च्या कर्णकर्कश्य पेक्षा थोडा नाजूक वाटला. त्याला खिडकीपाशी जाउन सांगणं आवश्यक होतं कि कन्या खाली उतरतच आहे आणि थांब म्हणून. म्हणून घाईघाईने खिडकीपाशी गेले आणि खाली वाकून van ला नजर शोधू लागली तर van काही दिसेना. तिचे van चे काका एका वेगळ्याच कारपाशी उभे राहिलेले होते.    अजून बारकाईने पाहिले तर ती ...

अजून एक चित्र

Image
डिसेम्बेरच्या शेवटच्या आठवड्यात आम्हाला ऑफिसला सुट्टी असते. त्यामुळे ते जवळ जवळ ८-१० दिवस फक्त मुली आणि घर ह्यांच्यातच घालवले. त्यामुळे ब्लोग जरा दुर्लक्षित राहिला. त्यामुळे ही खूप दिवसांनंतरची हजेरी. चित्रकलेचा क्लास अर्थातच चालू आहे. आता जस-जसे दिवस जात आहेत तस-तसे माझी गुरु मला चित्रकलेतली वेग-वेगळी तंत्र शिकवत आहे. हे चित्र त्यातलाच एक भाग. बर्याच त्रुटी राहिल्या आहेत. पण अजून जमेल ही आशा आहेच... बघा तुम्हाला कसं वाटतंय हे चित्र ते!