Posts

Showing posts from 2018

भीज पाऊस

Image
अश्याच एका शांत दुपारी होते निरभ्र आकाश अन् पाहता पाहता आले मळभ दाटून जुन्या आठवणींचा जणू तळ आला ढवळून चहू दिशा अंधारल्या जीव गेला घाबरून वाटे येईल आता सोसाट्याच्या वारा जाईल झोडपून आसमंत सारा पण पाहते तो काय केवळ होत्या संततधारा आला होता भीज पाऊस चिंबवून गेला भोवताल सारा!

माया

सध्या राहते त्या सोसायटीमध्ये राहायला येऊन साधारण १५ वर्षे झाली. नुकतीच राहायला आले तेव्हा इथे राहणाऱ्या लोकांच्या थोड्याफार ओळखी होत होत्या. तशी आमची सोसायटी छोटेखानी म्हणजे तीन बिल्डिंगचीच आहे. आणि सोसायटीत मध्य भागात एक कट्टा आहे तिथे महिलामंडळ बसलेलं असतं. तर संध्याकाळी चक्कर मारायला बाहेर पडलं की महिलामंडळाची भेट व्हायची. तिथल्या काकवांचा वयोगट साधारण ४०-४५ च्या पुढचा. छान गप्पा, हसणे-खिदळणे ऐकू यायचे. पण त्यांच्यात अजून एक दणदणीत आवाज ऐकू यायचा. आणि व्यवस्थित पाहिले तर त्या ग्रूपमध्ये सर्वांच्या मानाने खूपच तरुण आणि उत्साही 'ती' दिसायची. कट्ट्यावरच्या बायकांमध्ये तरुणाई आणि चैतन्य घेऊन येणाऱ्या तिचे काही दिवसातच नाव कळले - माया! राहायला ती अगदी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये. साधारण साडेपाच फूट उंची असलेली, तब्यतीने दणकट, गहूवर्णी आणि तरतरीत अशी ही माया. नंतर कळले की ती मूळची दाक्षिणात्य. परंतु अनेक वर्षे मराठीबहुल भागात राहत असल्याने इंग्लिश-हिंदीमिश्रित मराठी बोलणारी. वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास आणि सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून राहायचे तिचे कसब अगदी वाखाणण्याजोगे. तिचे कपडे...

उपवासाची चंपाकली

Image
=================================== हा प्रयोग मायबोली ह्या संकेतस्थळावरील स्पर्धेसाठी केला आहे. =================================== मायबोलीवर पाककृती स्पर्धेची घोषणा झालीआणि त्यात भाग घेण्यासाठी डोक्यातविचारचक्र सुरु झाले. सर्वात आधी विचारआला की माझ्या मावशीला विचारावे. माझीमावशी अत्यंत प्रयोगशील त्यामुळे दिलेलेजिन्नस वापरून ती नक्कीच नवीन काहीतरीपदार्थ सुचवेल ह्याची खात्री होती. पण पुन्हामनात स्वतःचं असं स्वतंत्र विचारचक्र सुरुझालं. मध्यंतरी फेसबुकवरच्या एका ग्रुपमध्येमैत्रिणीच्या आईने चंपाकलीचे फोटो टाकलेहोते. तेव्हापासूनच ती पाककृती करूनपाहायची इच्छा होती. पण मुहूर्त काही लागलानाही. जेव्हा ह्या स्पर्धेची घोषणा झाली तेव्हाराजगिऱ्याचं पीठ वापरून चंपाकलीचा प्रयोगकरता येईल का असं वाटलं. पण घरातीलगणपती आणि अशीच एक अडचण असल्यानेशेवटी कालचा मुहूर्त लागला. राजगिऱ्याच्या पिठाला थोडा चिकटपणाअसतो हे मला माहित होते. पण त्याची पातळपोळी लाटून, त्याला काप देऊन चंपाकलीसाठीगुंडाळणे ह्यासाठी अजून चिकटपणा हवा असेवाटून त्यात शिजलेला बटाटा घालायचे ठरवले.आणि सांगू काय हा प्रयोग यशस्वी झ...

गणपतीपूजन आणि मोदक

Image
गणपती आणि मोदक आपल्या मनातले घट्ट समीकरण. घरी गणपतीची स्थापना आणि पूजन करायचे म्हणजे मोदक हे केलेच पाहिजे. तर माहेर मराठवाड्यातील असल्याने मोदक म्हणजे तळणीचे मोदक हेच माहित. (आणि माझ्या बाबांना अजूनही तेच आवडतात.) पण मग आम्ही पुण्यात राहायला आलो आणि उकडीचे मोदक हा प्रकार कळला. तसेच लग्नानंतर अनेक नवनवीन गोष्टी करून पाहण्याची हौस असल्याने आणि नवरा पण सगळं कौतुकाने खाणाऱ्यांपैकी असल्याने उकडीचे मोदक करायला सुरुवात केली. पण वर्षातून केवळ एकदा केल्याने त्यावर फारसा हात असा बसलाच नाही.  सासर सोलापूरचे असल्याने तिकडे पण तांदळाच्या पिठीचे उकडीचे मोदक केले जात नाहीत. परंतु आमच्याकडे कणकेच्या पारीत मोदकाचे सारण भरून त्यांना वाफवायची पद्धत आहे (दिंड करतो तसे). तसं पहिला गेलं तर करायला सोप्पे. त्यामुळे ह्यावेळेस तश्याच पद्धतीने केले. आणि त्यात लेकीने मोदक करायला मदत केली. म्हणजे जेवढे केले त्यातल्या निम्म्याच्यावर तर तिनेच केले. मी कणकेची पारी लाटून देत होते आणि ती त्यात सारण भरून मोदक तयार करत होती. त्यामुळे ह्यावेळेसच्या मोदकांचे विशेष कौतुक.  तसा ह्यावेळेचा गणेशोत्सव खासंच आह...

उगाच काहीतरी!

Image
आज आमच्या सोसायटीमध्ये भिशी होती. ज्यांच्याकडे होती त्या काकू साठीच्या पुढच्या आणि पुण्यातील एका प्रयोगशील शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या. त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत. आणि ती खूपच सुंदर आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी oil pastels वापरून चित्रे काढून त्याला लॅमिनेट करून सुंदर अशी टेबल मॅट बनवली आहेत. त्यांचा तो उत्साह बघून मलाही काही तरी करावेसे वाटले म्हणून घरी आल्यावर लगोलग oil pastels घेऊन चित्र काढायचा प्रयत्न केला.  प्रयत्न अगदीच बाळबोध आहे पण तरीही ...     

गुरूवंदना

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः  गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता, विष्णू हा ह्या विश्वाचा पालनकर्ता आणि महेश हा विनाशक.  तसेच गुरु हा देखील ब्रह्माप्रमाणे विदयार्थ्यांच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवून सर्जनशीलतेचा निर्माता, विष्णूप्रमाणे दिलेल्या ज्ञानाचे संवर्धन करणारा; तसेच महेशाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा विनाश करणारा असतो. गुरु हा परब्रह्मासमान आहे. अश्या ह्या गुरूला मनोभावे नमस्कार! Brahma is the creator of this universe, Vishnu is the one who maintains it whereas Mahesh is the destroyer.  Similarly, like Brahma Guru sows the seed of knowledge in Vidyarthis' mind so as to let them bloom their creativity. Like Vishnu, Guru helps maintaining their knowledge, And like Mahesh, Guru destroys the ignorance from their mind.  Guru is the 'Parabrahma'. We bow down in front of such a Guru!

तुम बिन जाऊँ कहां.. (शतशब्दकथा)

रोजच्यासारखी मुले शाळेला गेली होती. आता शलाकाने आदित्यच्या डब्याची तयारी सुरु केली. जणूकाही एक शर्यत संपली होती आणि क्षणाचीही उसंत न घेता दुसऱ्या शर्यतीसाठी धावायचे होते. करायची कामे आणि हातातील वेळ यांचं व्यस्तप्रमाण तिच्यावरचे दडपण वाढवत होते. तेवढ्यात आदित्यच्या हातून फ्रिजमधून काढलेली अंडी खाली पडली. झालं शलाकाचा पारा चढला आणि ती त्याला फाडफाड बोलू लागली. खरंतर सकाळच्या कामात मदत करताना झालेला हा अपघात होता त्यामुळे आदित्यही वैतागला. बस झाली ही कटकट, जातोच ऑफिसला म्हणून तो वळला आणि रेडिओवर गाणे लागले 'तुम बिन जाऊँ कहां..' क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून ओठांवर स्मितहास्य झळकले. अचानक वातावरणातला ताण निवळला अन् शलाकाचाही चेहरा खुलला!

लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग २)

Image
भाग १: http://mana-tarang.blogspot.com/2018/07/blog-post_9.html पूर्वतयारी आणि पूर्वप्रवास १. ह्या प्रवासाच्या तयारीमध्ये अनेक गोष्टी होत्या. प्रत्यक्ष प्रवासाची बॅग भरणे, औषधपाणी घेणे, नवरा आणि मुलींना सोडून जात असल्याने त्यांच्याशी बोलणे, त्यांना घरात काही खायला-प्यायला लागेल त्याची तयारी करून ठेवणे. असं ट्रीपला जायचं हा निर्णय तर झाला होता. परंतु हा निर्णय का घेतला ह्यामागची भूमिका मुलींना समजावून सांगणे फार महत्वाचे वाटले. कारण तश्या त्या लहान आहेत - मोठी १४ वर्षांची आणि धाकटी १० वर्षांची. त्यांना सांगितले की कुठल्याही जबाबदारीचे ओझे न बाळगता आम्हा तिघींना एकत्र वेळ घालवायचा आहे. तिघींपैकी कोणाच्या घरी जमले तर घराच्या जबाबदाऱ्या संपत नाहीत आणि आईकडे गेले तर तिला कामाचा त्रास होऊ नये म्हणून तिच्याकडे थोडीफार कामाची जबाबदारी घ्यावीच लागते. त्यामुळे सारखा कुठली ना कुठली भूमिका वठवावीच लागते. ही सहल फक्त आमच्या आम्हीच आणि कुठल्याही प्रकारच्या जबाबदारीची झूल न पांघरता करायची सहल होती. माझ्या मुली खूपच समजूतदार असल्याने त्यांनी तसा काहीच आक्षेप घेतला नाही. माझे सासू-स...

लेह लडाख प्रवास - एक चाकोरीबाहेरचा प्रवास (भाग १)

प्रस्तावना: १.  मे २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात लेह, लडाखला जाऊन आले. ह्या प्रवासाचे वर्णन नक्की लिहून काढायचे असे ठरवले होते. मग नाव काय द्यायचे त्याचा विचार सूरु केला. आजकाल इंग्लिशमधेच बऱ्याचदा विचार करायची सवय झालेली असल्याने, सुरुवातीला नावसुद्धा इंग्लिशच सुचलं - Leh Ladakh Trip - A Journey Within! पण मग बाकीचे लेखन मराठीमध्ये करणार असल्याने हे नाव कसं चालणार, म्हणून मग पुन्हा विचार सुरु केला. ह्या इंग्लिश नावाचे मला वाटणारे 'लेह लडाख सहल - एक अंतर्मनातला प्रवास' असे भाषांतर सुचले. पण ते फारंच कृत्रिम वाटले. मग पुन्हा नावासाठीचा शोध आणि विचार सुरु झाला.  मग विचार केला की हा प्रवास, मी माझ्यापुरती चाकोरी मोडून केलेला आहे. म्हणजे खरंतर लेह-लडाख हा प्रवास कित्येक लोक सायकल, बाईक किंवा स्वतःची कार घेऊन करतात. पण माझा प्रवास तर 'वीणा वर्ल्ड' सारख्या सहलींचे नियोजनपूर्वक आयोजन करणाऱ्या कंपनीतर्फे एका ३० लोकांच्या समूहाबरोबर केलेला प्रवास होता. मग एवढी काय मोठी गोष्ट! तर हा प्रवास मी माझा नवरा आणि मुली ह्यांच्यासोबत न करता बहिणींबरोबर केला. तसं पाहायला गेलं...

अधुरी एक कहाणी... (शतशब्दकथा)

पाऊस सुरू झालेला पाहून अॅना मोहरली. फेलिक्सने ज्याला ती लाडाने फेलिस म्हणायची, नुकतीच तिला मागणी घातली होती. आज संध्याकाळी त्यांच्या मीलनाचा मुहूर्त ठरला होता. मीलनाची ओढ आणि हा पाऊस तिची हुरहुर वाढवत होता.  दिवसभर पडणारा संततधार पाऊस आता थांबला होता. प्रणयरंगात रंगण्यासाठी दोघांनी एक जागाही शोधली होती. बागेतला हवा तसा एकांत देणारा कोपरा होता तो.  ती घटिका आली आणि फेलिस तिथे पोहोचला तेव्हा अॅना त्याची वाटच पाहत होती. त्याला पाहून अॅना झक्क लाजली. फेलिसने तिला आपल्या बाहुपाशात ओढले आणि...  'डासांचा प्रादूर्भाव टाळा आणि मलेरिया दूर पळवा' अशी घोषणा करत महानगरपालिकेची गाडी औषधाच्या धूराचा झोत त्या बागेच्या कोपर्यान् कोपर्यात मारून गेली! 

हरीच्या नैवेद्याला केली...

Image
हरीच्या नैवेद्याला केली... लहानपणी कायम भोंडल्याला म्हणलेले हे गाणे. तेव्हाही मला खूप आवडायचे आणि आता म्हणत नसले तरी बऱ्यापैकी आठवते. तर हादग्याला अजून बरेच दिवस असताना मधेच का बरे मला हे गाणे आठवावे... तर झाले असे की सकाळी तापवलेले दूध दुपारी तापवले नाही आणि संध्याकाळी तापवायला ठेवायला उशीर झाला. सध्या उन्हाळा इतका निर्मम आहे की ही चूक अक्षम्य ठरली. मग काय, म्हणावे लागले मला "दूध तापवायला झाला उशीर, झाले त्याचे पनीर". आता इतके वर्षे गृहिणीपद सांभाळत असल्याने ते दूध काही टाकून देववेना. मग केला विचार की "ठेवेन त्याला आचेवर मंद आणि करेन त्याचा छानसा कलाकंद". मग काय घेतली लोखंडी कढई आणि पेटवला गॅस अन ओतले ते घट्ट झालेले दूध त्यात आणि ढवळायला चालू लागले माझे हात. त्यात असलेले पाणी आटले आणि मग घातली त्यात थोडी साखर. विरघळली साखर आणि ते मिश्रण सुटू लागले कडेने. अंदाजाने वाटले झाले पुरेसे कोरडे. मग एका ताटलीला तुपाचा हात लावून पसरले त्यात. त्यावर घातले थोडे बदामाचे पातळ काप अन झाला की कलाकंद झ्याक!    तळटीप: १. ही पाककृती म्हणजे बिघडलेले निस्तरायला प्रयत्न असल...

सुरळीच्या वड्या

Image
सुरळीच्या वड्या आज माझ्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यामुळे त्यांना भेटायला जायचे होते. इतके वर्ष नोकरी करत असताना कायम बाबांना आवडतात म्हणून बाहेरून ढोकळे वगैरे घेऊन जायचे. पण आज ठरवले की आपण स्वतः  करून न्यावे. बाबांना आवडते म्हणून सुरळीची वडी करावी असे ठरवले. मदतीसाठी हमखास पाकसिद्धीच्या देशपांडे काकू होत्याच. (हमखास पाकसिद्धी हे एक पुस्तक पाककृतींचे मराठीतील पुस्तक आहे. माझ्या बहिणीने मला लग्न झाल्या झाल्या भेट म्हणून दिले होते. माझं फार आवडतं पुस्तक. कारण त्यात नवशिक्यांसाठी व्यवस्थित प्रमाण दिलेले आहे. त्याचबरोबर कृतीसुद्धा अगदी मुद्देसूद आहेत. आणि टीपांमध्ये काही युक्त्या आणि काय चुका होऊ शकतात हेही दिलेलं आहे. काहीकाही ठिकाणी चुका कश्या निस्तरायच्या हेही दिले आहे. अरे बापरे! मी तर पुस्तकाचे परीक्षणच सुरु केले.) पुन्हा मुद्द्याचं बोलते. तर कित्येक वर्षांमध्ये केलेली नसल्याने प्रचंड भीती वाटत होती. मग काय सुरु  केलं मी "शुरु करें सुरळीची वडी, लेके प्रभू का नाम". म्हणलं 'म' आलं म्हणजे मस्तंच होणार वडी. आणि एवढं आवर्जून आईबाबांसाठी करत आहे म्हणल्या...

कांदा कैरीची चटणी

Image
कांदा कैरीची चटणी (with English version of the recipe)  कांदा कैरीची चटणी हा प्रकार माझ्या सासरी म्हणजे सोलापूर भागात  विशेष प्रचलित आहे. माझ्या माहेरी वडील मराठवाड्यातले तर आई कानडी वैष्णव. आईच्या स्वयंपाकात कांदा-लसणाचा वापर अगदी नगण्य होता. त्यामुळे माझी माझी बारावी  होईपर्यंत मला जेवणात कांदा खायची सवय नव्हती आणि त्यामुळे आवड. त्यामुळे मी माझ्या आत्याकडे सोलापूरला गेले की आत्या कांदा-कैरीची चटणी करायची आणि माझ्यासाठी खास फक्त कैरीची चटणी करायची. पण मग बारावी पूर्ण केल्यानंतर मी शिक्षणासाठी पुण्याबाहेर गेले आणि हॉस्टेलमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कांदा घातलेला असायची सवय करून घ्यावी लागली. सुरुवातीला फार अवघड आणि त्रासदायक होतं. पण हळूहळू सवय झाली. लग्नानंतर नवऱ्याला कांदा-लसूण घातलेला खूप आवडत असल्याने आता माझ्या स्वयंपाकात त्यांचा सर्रास वापर असतो. म्हणजे आमच्याकडे वैशाखात नरसिंहाच्या नवरात्र असतं तेव्हा कांदा-लसूण पूर्ण वर्ज्य असते, तेव्हा स्वयंपाक करणे फार अवघड जाते. तर आज मुद्दा आहे तो कांदा कैरीच्या चटणीच्या पाककृतीचा. चटण्या करायच्या म्हणजे...

And I changed my profession... (Part 5)

Image
No journey is an easy journey. Similarly, my journey of capturing my transition in words is not easy. There are times which I find difficult to capture in words. Now I have come to a junction which was or still is very important in the overall process of my evolution. The point was to quit my existing job. Though I started on this path with a plan to shift my profession, but to resign and devote completely to this new venture was a real BIG decision. I was working in a product based MNC and hence was drawing a really good salary. So looking at the bigger picture and losing on the short term gains (in terms of salary) was not an easy decision to take. But somehow it HAPPENED. These are just a few lines, but it was a turmoil which I find difficult to pen. But as we know, every new birth is not an easy thing. Even a butterfly has to struggle a lot to come out of its cocoon before it can spread its beautiful wings. So in September 2016 I was at home with just 2 students (in...

कैरीची चटणी

Image
कैरीची चटणी हा कैरीच्या चटणीचा प्रकार माझा विशेष आवडता आहे. एकतर लहानपणापासून ह्याच पद्धतीने केलेली चटणी खाल्ली आहे. तसेच शाळेत असताना म्हणजे साधारण सातवी-आठवी मध्ये असताना आम्ही मैत्रिणींनी स्वयंपाक केला होता तेव्हा मी ही चटणी केली होती आणि सगळ्यांना खूप आवडली होती. तर विचार केला की तुम्हा सर्वांना त्याची पाककृती सांगावी.   तर आता अजून पाल्हाळ न लावता साहित्य आणि कृती सांगते.  साहित्य: कैऱ्या - पाव किलो गूळ   - बारीक चिरून १/२ वाटी  तिखट - २-३ चमचे   दाण्याचा कूट - २-३ चहाचे चमचे  मीठ - चवीनुसार  फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि किंचित मेथ्याची पूड    कृती: १. कैऱ्या स्वच्छ धुऊन घेणे आणि साल काढून किसून घेणे.  २. किसलेल्या कैरीमध्ये तिखट, मीठ, गूळ आणि दाण्याचा कूट मिसळणे.  ३. सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घेणे.  ४.  सांगितलेले पदार्थ वापरून फोडणी करून घेणे आणि चटणीमध्ये मिसळणे. तर आंबट, तिखट आणि गोड चवीची चटणी तयार आहे.  टीप: १. कैर...

कढिपत्त्याची चटणी

Image
कढिपत्त्याची चटणी  साहित्य: कढिपत्त्याची पाने - एक वाटी कारळे - २ मोठे चमचे तीळ    - २ चमचे सुके खोबरे (पातळ क‍ाप) - २ चमचे सुक्या लाल मिरच्या - ५ - ६ लाल तिखट - २ - ३ लहान चमचे  चिंच - १-२ बुटुक गूळ - किंचित चवीपुरता मीठ - चवीपुरते कृती: १. कढिपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन घेणे.  २. कढिपत्त्याची पाने किंचित तेलात परतून घेणे.  ३. सुक्या मिरच्या व चिंच किंचित तेलात परतून घेणे. ४. कारळ, तीळ आणि सुके खोबरे तेल न घालता वेगवेगळे परतून घेणे. ५. सर्व भाजून घेतलेले पदार्थ, तिखट, गूळ आणि मीठ एकत्र करून मिक्सर मधे बारीक करणे. अशी तिखट आणि किंचित आंबटगोड चवीची चटणी तयार आहे. हयामधे कढिपत्त्याचे प्रमाण आवडीनुसार वाढवू शकता. पाककृतीचा स्रोत: माझी आई 

And I changed my profession... (Part 4)

As I mentioned in my previous post, I actually got a query regarding tuition. We (the student's mother and I) decided to have a trial period because we wanted to see if the said girl was comfortable with me and my teaching. So she started coming for Mathematics only tuition. We set the timing as 7 in the evening as I was working then. So my routine was - come back from the office by 6 PM, freshen up, cook dinner and then start the class at 7 PM. The class used to end by 8:15 - 8:30. Then we used to have dinner and many a times by 9:30 PM I used to login to my office's laptop to complete my office work. After almost 15 days of trial, both of us felt comfortable and confident that we can continue the class. Till then I did not allow my daughter to attend the class, as I wanted to build rapport with the girl. If you do not understand the concepts of Mathematics, you cannot solve the problems. And when you cannot solve the problems, you immediately get to know (becaus...

देवता

कोणी तरी तिला सांगितले होते की नदीच्या त्या किनार्या लगतच्या डोंगरापलिकडे एक देऊळ आहे. त्या देवळातल्या देवतेकडे सुखासमाधानाची किल्ली आहे. मजल दरमजल करत ती पोहोचली त्या देवळात. तर मूर्तीच्या जागी एक लख्ख आरसा होता. =============================== मायबोली ह्या संकेत स्थळावर मराठी भाषा दिन २०१८ साजरा केला. त्यात गोष्ट तशी छोटी हा उपक्रम होता. गोष्टीमधे किनारा, डोंगर, आरसा हे शब्द येणे अपेक्षित होते. तर त्यात लिहिलेली ही गोष्ट. 

And I changed my profession... (Part 3)

This part is going to be a little difficult for me. There was a time when many things were going on in my mind. Now looking back at that that turbulent time from a distance and putting it down rationally is a task for me. Also this part involves a bit about academic performance of my elder one. She does not like me talking about it. And she is one the readers of write ups. But I hope she will be able to understand my state of mind then. So the thoughts of taking tuition started shaping up in my mind and my elder daughter's academic performance needed serious attention. She was studying in 7th standard then. Her school is a CBSE board affiliated school. As compared to SSC board, the volume of overall curriculum is more in CBSE. Also you need to understand the concepts thoroughly so as to attempt all the questions in the paper and get good marks. I, being a full time working professional, was not at all involved in her studies. Whatever was taught in the school was not sufficie...

असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन...

उगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत  त्याच्या हृदयाची वाढली होती धडधड  तिच्याही काळजात होत होतं लकलक कारण तो होता ट्रेडमिलवर धावत  आणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत  दिला तिने त्याला आवर्जून फूल  पण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल  निघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर  कारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर  पोहोचला एकदाचा तो ऑफिसला  होतीच 'ती' तिथे सोबतीला  सुरु झालं त्याचं आणि तिचं गूज  म्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच  तिचाही 'तो' होता घरात सोबतीला     देईना तिला एकही क्षण फुरसतील  कॉम्प्युटरची सिस्टीम होती त्याची 'शिरीन' अन घरकामाचा रगाडा तिचा 'फरहाद' मावळला दिनकर अन झाला त्यांचा कॅन्डल लाईट डिनर  कारण होती MSEB ची कृपा त्यांच्यावर  तो शिरला निद्रादेवीच्या कुशीत अन ती बसली लेकीचा प्रोजेक्ट करीत  म्हणे उगवला होता प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत... 

And I changed my profession... (Part 2)

When I said that I came to the decision of 'Teaching' as an alternate profession, there was some background to it. I completed BE (Electronics) in the year 1999. It was the time when we can say IT industry was in the full swing. Many of my friends, batch mates had opted for jobs in the software industry. I didn't want to do something just because everybody was doing it. As I wanted some time to decide on my career path, I joined one of the reputed engineering colleges in Pune as a visiting lecturer. During my stint as a lecturer for six months, I realized that I can teach and also like to do so. Then I was just a fresh pass out without any actual experience. I did not like the idea of teaching engineering subjects without the knowledge of practical applications. I took a decision that I should have at least 5 - 6 years of industry experience and join teaching back. But once I joined the industry, the thought of coming back to 'Teaching' was put on the ...

And I changed my profession…(Part 1)

It was almost 3 years ago, I was having very well paid job fetching me a handsome salary every month, working with finest people in my field. And still a thought process started in the back of my mind – ‘shall I be continuing this further?’ and ‘if not, then what?’ Though I working in the domain I loved, on the latest technology which was in a way touching people’s lives, day by day the work was getting very demanding. And I expected it to be more in the future than what it was then. Somewhere it was upsetting the priorities that I had set.  Then there was another thought about life after retirement. (Though it was quite at an early stage of life as I was not even nearing 40 then!) Being used to be engaged all the time, how to cope with being unoccupied. I couldn’t and still can’t imagine myself in front of the television, watching daily soaps.  Apparently I am extrovert, but it’s quite difficult for me to mix with people. So the idea of going out and meeting and ...

दिसला गं बाई दिसला...

मागच्या आठवडयापासून व्हॉट्सअँप आणि फेसबुक वर मेसेज यायला लागले की ३१ चा दिवस (की रात्र?) खास आहे. आणि खासियत काय तर एकाच दिवशी (आता पुन्हा दिवशी की रात्री? फार बोर मारतेय ना!) blood moon, blue moon, super moon आणि चंद्रग्रहण असं सगळं दिसणार आहे. मला बापडीला प्रश्न पडला की पृथ्वीला तर एकच चंद्र, मग ह्या एकाच चंद्राचे एवढे प्रकार दिसणार कसे! मग शाळेच्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअँप ग्रुपवर पण चर्चासत्र सुरु झाले की ३१ जानेवारीचा चंद्र असा काय विशेष असणार आहे. एक मैत्रीण म्हणाली की कदाचित बर्फ पडणाऱ्या पाश्चिमात्य देशात तो निळा दिसत असणार आणि आपल्याकडे लाल. म्हणून मग एकाच वेळी blue noon आणि blood moon आहे असं म्हणत असणार. आणि मैत्रीण हेही म्हणाली की कदाचित म्हणूनच इंग्लिशमध्ये 'once in a blue moon' हा वाक्प्रचार प्रचलित असणार. म्हटलं हे तार्किकदृष्ट्या बरोबर वाटत आहे. पण त्या देवाला ज्याने तो चंद्र आणि आपल्याला बनवलं, त्यालाच काळजी. (म्हणजे मी सश्रद्ध आहे हो. त्या देवामुळेच पृथ्वी, चंद्र आणि आपण सगळे आहोत ही श्रद्धा - कपूरांची नाही तर माझीच). आणि आमच्या ग्रुपमध्ये अत्यंत...